Bhandara : अंगणवाड्यांची दुरवस्था! 52 पैकी 44 अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत, 20 अंगणवाड्यांमध्ये बाथरूमच नाही; चिमुकल्यांचे हाल

भंडारा : भंडारा शहरातील अंगणवाड्यांची दुरवस्था चिमुकल्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे. शहरात तब्बल 52 अंगणवाडी केंद्रे असून, त्यापैकी 44 अंगणवाड्या आजही भाड्याच्या खोल्यांमध्ये भरवल्या जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल 20 अंगणवाडी केंद्रांमध्ये चिमुकल्यांसाठी बाथरूमची व्यवस्थाच उपलब्ध नाही. त्यामुळे नैसर्गिक विधीसाठी लहान मुलांना उघड्या जागेचा आधार घ्यावा लागतो. अशाच परिस्थितीत 6 ऑगस्ट रोजी एका चिमुकलीवर अत्याचाराची […]

Bhandara : अंगणवाड्यांची दुरवस्था! 52 पैकी 44 अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत, 20 अंगणवाड्यांमध्ये बाथरूमच नाही; चिमुकल्यांचे हाल

भंडारा : भंडारा शहरातील अंगणवाड्यांची दुरवस्था चिमुकल्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे. शहरात तब्बल 52 अंगणवाडी केंद्रे असून, त्यापैकी 44 अंगणवाड्या आजही भाड्याच्या खोल्यांमध्ये भरवल्या जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल 20 अंगणवाडी केंद्रांमध्ये चिमुकल्यांसाठी बाथरूमची व्यवस्थाच उपलब्ध नाही. त्यामुळे नैसर्गिक विधीसाठी लहान मुलांना उघड्या जागेचा आधार घ्यावा लागतो. अशाच परिस्थितीत 6 ऑगस्ट रोजी एका चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडल्याने अंगणवाड्यांमधील पायाभूत सुविधांसोबतच मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. नगर परिषद प्रशासनाकडून चिमुकल्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता पालकांकडून केला जात आहे.

हेही वाचा : Crime News : पुरंदरमध्ये नसरापूर प्रकरणाची पुनरावृत्ती! चिमुरडीवर 60 वर्षीय नराधमाकडून अत्याचार; घरामागच्या बागेत घेऊन गेला अन्…

ही दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला एखाद्या जुन्याआणि टीनाचे पत्रे पाहून मोडकळीस आलेल्या इमारतीची आठवण होईल. मात्र ही कोणतीही पडकी इमारत नाही, ही आहे भंडारा शहरातील चिमुकल्यांना घडविणारी अंगणवाडी केंद्रे. ज्या वयात मुलांना सुरक्षित वातावरण, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा मिळणे अपेक्षित आहे. त्याच वयात या चिमुकल्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. भंडारा शहरात एकूण 52 अंगणवाडी केंद्रे आहेत. मात्र यापैकी तब्बल 44 अंगणवाडी केंद्रे भाड्याच्या खोल्यांमध्ये सुरू आहेत. भाड्याच्या जागेत अंगणवाडी सुरू असल्याने जागेची कमतरता, स्वच्छतागृहांचा अभाव आणि मुलांच्या सुरक्षिततेचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यातील तब्बल 20 अंगणवाडी केंद्रांमध्ये बाथरूमची सुविधाच उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच, चिमुकल्यांना नैसर्गिक विधीसाठी उघड्या जागेचा आधार घ्यावा लागतो. तीन ते सहा वर्षांची चिमुकली मुलं, त्यांना स्वच्छतागृहाचा वापर करण्याची सवय लावायची. स्वच्छतेचे धडे द्यायचे आणि दुसरीकडे त्यांच्यासाठी अंगणवाडीत साधं बाथरूमही उपलब्ध नाही. ही केवळ सुविधांची कमतरता आहे का?, की प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव?, हा प्रश्न आता पालकांकडून उपस्थित केला जात आहे.  याबाबत आदमार नाना पटोले, नगरसेवक कमल साठवणे, भंडारा जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी नि. ना. मोहुले यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number