विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ऑडिओ क्लिप ऐकण्याचा दिला सल्ला

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आता पुण्यात घडलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाविषयी राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होतांना दिसत आहे. या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. या प्रकरणामुळे विरोधकांनी […]

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ऑडिओ क्लिप ऐकण्याचा दिला सल्ला

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आता पुण्यात घडलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाविषयी राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होतांना दिसत आहे. या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. या प्रकरणामुळे विरोधकांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. यावर शिवसेनाकडून म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून एक स्पष्टीकरण आलं होत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यंत्र्याना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ क्लिप ऐकण्याचा सल्ला दिला आहे.

या प्रकरणात एका मंत्र्याच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं. याप्रकरणावर “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं वक्तव्य ऐकून त्यांनी या प्रकरणाची माहिती नीट घेतली नसल्याचं वाटतं. उद्धव ठाकरेंना गांभीर्य लक्षात आलेलं नाही. त्यांनी याप्रकरणाला गांभीर्यानं घेतलेले दिसत नाही. त्यांनी या प्रकरणाची नीट माहिती घ्यावी, क्लिप्स नीट ऐकाव्या म्हणजे कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय ते कळेल,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं की या प्रकरणावर “व्यवस्थित चौकशी केली जाईल, जे सत्य आहे ते बाहेर येईलच. यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज आहे, त्यांच्यावर कारवाई होईल. तसेच“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलीस दबावात आहेत का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचा आहे, हे स्पष्ट आहे. पोलिसांनी ते सांगितलं पाहिजे. पोलिसांची कारवाई दबावात होत असल्याचं स्पष्ट दिसतंय. पोलीस जोपर्यंत कारवाई करत नाहीत तोपर्यंत त्यांना खुलं मैदान आहे. पोलिसांवरील दबाव नाहीसा झाला पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते, “या संदर्भात व्यवस्थित चौकशी केली जाईल. जे सत्य आहे ते बाहेर येणारचं. यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज आहे त्यांच्यावर कारवाई होईल. सखोल चौकशी केली जाईल. पण गेल्या काही महिन्यांपासून एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जातोय. असाही प्रयत्न होता कामा नये आणि सत्यही लपवण्याचा प्रयत्न होता कामा नये.यामध्ये जे सत्य असेल ते संपूर्ण चौकशी करून जनतेसमोर येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल”, असं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं होतं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number