PM Narendra Modi: 2026 चे जल्लोषात स्वागत; पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून देशवासीयांना नववर्ष 2026 च्या शुभेच्छा दिल्या.
PM Narendra Modi: 2026 चे जल्लोषात स्वागत; पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. भारतात 2026 चे स्वागत होत असताना, समाजात शांतता, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो, अशी प्रार्थना त्यांनी केली.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत पंतप्रधान मोदी म्हणाले, “सर्वांना 2026 च्या मनःपूर्वक शुभेच्छा. येणारे वर्ष उत्तम आरोग्य, समृद्धी घेऊन येवो. तुमच्या प्रत्येक प्रयत्नात यश मिळो आणि आयुष्यात समाधान लाभो. आपल्या समाजात शांतता आणि आनंद नांदो, हीच प्रार्थना.”

हेही वाचा: Virat Kolhi: विराट-अनुष्काचा क्युट फोटो आणि तासात 40 लाख लाईक्स; 2026 ची ‘विराट’सुरुवात

याचबरोबर दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत म्हटले, “2026 साठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष प्रत्येकासाठी नव्या आशा, नवे संकल्प आणि नव्या आत्मविश्वासाची सुरुवात ठरो. जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा हे वर्ष सर्वांना देवो.”

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नववर्ष हा नव्या उर्जेचा आणि नव्या सुरुवातीचा काळ असल्याचे सांगत, “2026 हे वर्ष आपल्या आयुष्यात शांतता, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो. एक सक्षम आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी नवी ऊर्जा मिळो,” अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

देशभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मोठ्या शहरांपासून ते छोट्या गावांपर्यंत फटाक्यांची आतषबाजी, सांस्कृतिक कार्यक्रम, लाईव्ह संगीत आणि आकर्षक सजावटींनी वातावरण आनंदी झाले होते. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी करत उत्साहात 2026 चे स्वागत केले.

एकूणच, शांतता, आशा आणि सकारात्मकतेच्या संदेशासह देशाने नव्या वर्षात पाऊल टाकले असून, 2026 कडून नागरिकांना नव्या अपेक्षा आणि संधींची आस आहे.

हेही वाचा: New Year rules 2026: नववर्षापासून मोठे बदल! रेशन कार्ड, पॅन-आधार ते क्रेडिट स्कोअरपर्यंत आजपासून लागू नवे नियम

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version