Pimpri Chinchwad: बटन दाबलं अन् नंबरप्लेटच गायब! पुणे-मुंबई हायवेवर कारचा थरार, RTO च्या कारवाईने उडाली खळबळ

मुंबई-पुणे एक्सप्रेस रोडवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारचालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लघन केल्यास दंड चुकवण्याकरिता हा अवैध प्रकार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pimpri Chinchwad: बटन दाबलं अन् नंबरप्लेटच गायब! पुणे-मुंबई हायवेवर कारचा थरार,  RTO च्या कारवाईने उडाली खळबळ

मुंबई-पुणे एक्सप्रेस रोडवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारचालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लघन केल्यास दंड चुकवण्याकरिता हा अवैध प्रकार केल्याचे स्पष्ट झाले आहे. यात कारचालकाने गाडीच्या मागच्या बाजूस असलेल्या नंबरप्लेटवर उघड-झाप करण्याचे शटर बसवले आहे. याचा व्हिडिओ एका व्हायरल रीलद्वारे समोर आला असून त्यावर कसून चौकशी करण्यात आली आहे. यासंबंधित कारसह चारचाकी मालकाचा शोध घेण्यात आला आहे, त्यावर मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार वाकड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा – Pune Crime : पुण्यातील भारती विद्यापीठात शिकणाऱ्या 21 वर्षीय डॉक्टर तरुणीचा मृत्यू; नवव्या मजल्यावरून मारली उडी, पोलिसांकडून तपास सुरू
 

यामुळे अशा प्रकारांमुळे वाहतूक नियमांची अवहेलना होत असून यावर प्रशासन कडक कारवाई करेल, याकडे विशेष लक्ष आहे. कारण नागरिकांमध्ये या प्रकारावरून चुकीचा संदेश पसरता कामा नये.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number