जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी
पिपंपरीत डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकुर्डी येथील म्हाळसाकांत शाळेजवळ सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मृत तरुण हा सिम्बायोसिस महाविद्यालयातील विद्यार्थी होता. जखमीला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपासादरम्यान डंपर चालकाला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.