जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महाराष्ट्रात पेट्रोलचे दर शंभरीकडे वाटचाल करत असताना कर्नाटकात मात्र पेट्रोलचे दर अद्यापही 80 रुपयांच्या आत आहे. कर्नाटकमधील निवडणुकीनंतर सुरु असलेली इंधन दरवाढ अजूनही कायम आहे. मुंबईत पेट्रोलच्या किमतीने उच्चांक गाठला असून पेट्रोलने लिटरमागे 84.73 रुपयांचा आकडा गाठला. तर डिझेलने लिटरमागे 72.53 रुपयांचा आकडा गाठला आहे.
कोल्हापुरात 84.85 रुपये दर असून शेजारील कोगणोली पेट्रोल पंपावर मात्र 78.63 रुपये असा दर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वाहनधारक या पेट्रोल पंपांकडे सध्या धाव घेताना पाहायला मिळत आहेत.
तर मार्केटिंगची हीच संधी साधत महाराष्ट्राच्या नाकावर टिचून ‘महाराष्ट्रसे सस्ता‘ असे फलक लावून ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
पेट्रोल दरवाढ (पेट्रोलचे दर प्रतिलिटरमागे)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.