जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ झाली असून, पेट्रोल प्रती लीटर 1रुपये 23 पैसे, तर डिझेल 89 पैसे प्रती लीटरने महागलं आहे.
मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत. यापूर्वी 16 मे रोजी पेट्रोलच्या किंमतीत 2.16 रुपये प्रती लीटर, तर डिझेलच्या किंमतीत 2.10 रुपये प्रती लीटरने कपात केली
होती.
मात्र, आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आल्याने वाहनधारकांच्या खिशावरचा ताण वाढला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.