Petrol – Diesel Prices Hiked : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दरवाढीचा धक्का! 12 दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या तुमच्या शहराचे दर

Petrol – Diesel Prices Hiked : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दरवाढीचा धक्का! 12 दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या तुमच्या शहराचे दर

नवी दिल्ली : तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) सोमवार, 25 मे रोजी पुन्हा पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 2.71 रुपयांनी वाढ केली आहे. गेल्या 12 दिवसांत पेट्रोल – डिझेलच्या किमतीत झालेली ही चौथी दरवाढ आहे. दीर्घकाळ दरवाढ थांबवल्यानंतर 15 मे रोजी इंधन दरवाढ पुन्हा सुरू झाल्यापासून, या ताज्या दरवाढीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमधील एकूण वाढ जवळपास प्रति लिटर 7.5 रुपये झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, सोने खरेदीबाबत वक्तव्य केल्यानंतर देशातील इंधन दरवाढ, दूध दरवाढ तसेच भाजीपाला दरात कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. 

हेही वाचा : Raigad Ambenali Ghat Accident: रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात! तब्बल 500 फुट खोल दरीत कोसळली स्कॉर्पिओ; दुर्घटनेचं नेमकं कारण काय?

दिल्लीत पेट्रोलचा दर 99.51 रुपयांवरून 102.12 रुपयांपर्यंत 2.61 रुपयांनी वाढला. दिल्लीत डिझेलचा दर 92.49 रुपयांवरून 95.20 रुपयांपर्यंत 2.71 रुपयांनी वाढला.

25 मे 2026 रोजीचे चार मेट्रो शहरांचे दर –

पेट्रोल –

दिल्ली 102.12 (+2.61)
कोलकाता 113.51 (+2.87)
मुंबई 111.21 (+2.72)
चेन्नई 107.77 (+2.46)

डिझेल

दिल्ली 95.20 (+2.71)
कोलकाता 99.82 (+2.80)
मुंबई 97.83 (+2.81)
चेन्नई 99.55 (+2.57)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version