सेल्फिचा कहर; मृत वाघालाही सोडले नाही

सेल्फिचा कहर; मृत वाघालाही सोडले नाही

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

नागपुरात पुन्हा एकदा असंवेदनशिलतेचं दर्शन घडलंय. बाजारगाव शिवारात रस्ता ओलांडतांना एका वाघाचा अपघातात मृत्यू झाला. सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. अज्ञान वाहनानं धडक दिल्यानं वाघाचा जागीच मृत्यू झालाय. घटनेनंतर बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

 

मात्र, बघ्यांनी वाघाच्या मृत्यूच्या दु:खापेक्षा सेल्फीचा कार्यक्रम सुरू केला. सेल्फी काढून नागरिकांनी असंवेदनशिलतेचं दर्शन तर घडवलंच. पण, त्यांच्या या सेल्फीच्या मोहामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची पण कोंडी झाली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version