‘जय महाराष्ट्र’च्या बातमीमुळे अखेर ससून रुग्णालयाला जाग, टाचा घासत रुग्ण हॉस्पिटलमधून बाहेर, व्हिलचेअर प्रकरणी चौकशी सुरु

  'जय महाराष्ट्र'च्या बातमीमुळे अखेर ससून रुग्णालय प्रशासनाला जाग आली आहे. अपघातात एका पायाचा अर्धा भाग गमावलेल्या रुग्णाला व्हिलचेअर असूनही ती न दिल्यामुळे तो जमिनीवर सरकत रुग्णालयात

‘जय महाराष्ट्र’च्या बातमीमुळे अखेर ससून रुग्णालयाला जाग, टाचा घासत रुग्ण हॉस्पिटलमधून बाहेर, व्हिलचेअर प्रकरणी चौकशी सुरु

पुणे:  'जय महाराष्ट्र'च्या बातमीमुळे अखेर ससून रुग्णालय प्रशासनाला जाग आली आहे. अपघातात एका पायाचा अर्धा भाग गमावलेल्या रुग्णाला व्हिलचेअर असूनही ती न दिल्यामुळे तो जमिनीवर सरकत रुग्णालयात वावर करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता या प्रकरणाची गंभीर दखल घेत ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

घटनेनुसार, सदर रुग्णचा अपघातात एका पायाचा अर्धा भाग गमवावला गेला होता  मात्र, हे दिसून सुद्धा रुग्णालयाने  व्हिलचेअर दिली नाही. एक पाय अर्धा गमावलेल्या रुग्णाला आधार देणारे कोणीही नव्हते. परिणामी, तो रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये जमिनीवर बसून सरकत सरकत बाहेर निघताना दिसला. ही दृश्य 'जय महाराष्ट्र'च्या कॅमेऱ्यात कैद झाली आणि बातमीच्या माध्यमातून समोर आली.

रुग्णालय प्रशासनाकडे व्हिलचेअर उपलब्ध असताना ती वापरली गेली नाही, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ही फक्त बेपर्वाई होती की कोणी मुद्दाम दुर्लक्ष केले? या प्रकरणाची चौकशी करून योग्यती माहिती समोर आणण्याचे आदेश अधिष्ठात्यांनी दिले आहेत. 

या बातमीनंतर समाज माध्यमांवर संतापाची लाट उसळली असून रुग्णांची तक्रार ऐकण्याऐवजी त्यांना दुर्लक्षित करणाऱ्या आरोग्यव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.सामान्य जनतेच्या आवाजाला न्याय मिळवून देण्यासाठी “जय महाराष्ट्र”नं या प्रकरणाची दखल घेतली आणि त्याचा थेट परिणाम प्रशासनाच्या कारवाईत दिसून येत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number