राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र व्दारा संलग्न सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याच्या पूर्ततेकरीता १४ मार्च २०२३ ला राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. त्या संपात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना सक्रीय सहभागी होत आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला आहे. जिल्ह्यातील २३ कर्मचारी संघटनांनी या मोर्चात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत. तापत्या उन्हात कर्मचाऱ्यांनी हा मोर्चा काढला या मोर्चात शेकडोंच्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले
जुनी पेन्शन योजना लागू करावी या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या आवाहनानुसार भंडारा जिल्ह्यातील सुमारे १५ हजार पेक्षा अधिक सरकारी, निम सरकारी, जिल्हा परिषद शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आरोग्य यंत्रणा संपात सहभागी झाले आहेत. या संपाला विविध कर्मचारी संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळं शासकीय कामे ठप्प झाल्याचं चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे.