Beed: बीड हादरलं! जिममध्ये ट्रेनर असलेल्या 25 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; कारण…

परळी शहरातील इंदिरानगर परिसरात 25 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

Beed: बीड हादरलं! जिममध्ये ट्रेनर असलेल्या 25 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; कारण…

बीड: परळी शहरातील इंदिरानगर परिसरात 25 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या तुलसी कमळू या तरुणीचा गुरुवारी दुपारी राहत्या घरात मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तुलसीच्या कुटुंबातील सदस्य काही कामासाठी घराबाहेर गेले होते. त्यावेळी ती घरात एकटीच होती. कुटुंबीय परतल्यानंतर त्यांना ती घरात मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर तातडीने घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

हेही वाचा: Crime News: वसतिगृहातील कारवाईचा सूड अन् पैशांची हाव; 10 वीच्या 2 विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिकेला 27 वेळा चाकूने वार करून संपवलं

संभाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्राथमिक कारवाई करत घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणाची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे तरुणीच्या मृत्यूमागे नेमके काय कारण होते, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत.

हेही वाचा: Digital Arrest : डिजिटल अरेस्टच्या दोन घटनांमध्ये 79 लाखांचा गंडा; बनावट अटक वॉरंट, जप्तीचे आदेश, कागदपत्रे पाठवून फसवणूक

तुलसीच्या मोबाईल फोनचीही पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. तिच्या फोनमधील कॉल रेकॉर्ड, संदेश आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे तपासाला दिशा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिच्या परिचितांकडून आणि कुटुंबीयांकडूनही माहिती घेतली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, तरुण वयातील या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या दुर्दैवी घटनेमागील कारण स्पष्ट होणार आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number