दीनदयाळ नागरी बँक निवडणुकीत पंकजा मुंडे गटाचा विजय

दीनदयाळ नागरी बँक निवडणुकीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटाचा विजय झाला आहे. दीनदयाळ नागरी बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून बँकेवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दीनदयाळ नागरी बॅंक निवडणूक ही १५ जागांसाठी होती. मात्र या १५ जागांपैकी चार जागा बिनविरोध निवडून आल्या, तर उर्वरित जागांसाठी निवडणूक पार […]

दीनदयाळ नागरी बँक निवडणुकीत पंकजा मुंडे गटाचा विजय

दीनदयाळ नागरी बँक निवडणुकीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटाचा विजय झाला आहे. दीनदयाळ नागरी बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून बँकेवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

दीनदयाळ नागरी बॅंक निवडणूक ही १५ जागांसाठी होती. मात्र या १५ जागांपैकी चार जागा बिनविरोध निवडून आल्या, तर उर्वरित जागांसाठी निवडणूक पार पडली. या उर्वरित जागांपैकी १० जागांवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे समर्थक विजयी झाले आहे. दीनदयाळ नागरी बँक निवडणुकीत पंकजा मुंडे गटाचा विजय झाल्यामुळे उमेदवारांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला, तर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विट केले की, दीनदयाळ नागरी बँकेसाठी झालेल्या निवडणूकीमध्ये दीनदयाळ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. सर्व विजयी उमेदवारांचे आणि संचालकंचे मन:पूर्वक अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number