पाकिस्तानचा थरकाप! राष्ट्रपतींनी मध्यरात्री बोलावले संसदेचे आपत्कालीन अधिवेशन

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी शनिवारी मध्यरात्री एक मोठा निर्णय घेतला आणि संसदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली.
पाकिस्तानचा थरकाप! राष्ट्रपतींनी मध्यरात्री बोलावले संसदेचे आपत्कालीन अधिवेशन
Edited Image

इस्लामाबाद: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर सतत पकड घट्ट करत आहे. भारताने अनेक कठोर पावले उचलून पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली आहे. दरम्यान, पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी शनिवारी मध्यरात्री एक मोठा निर्णय घेतला आणि संसदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली. हे अधिवेशन सोमवार, 5 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता इस्लामाबाद येथील संसद भवनात होणार आहे. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या संविधानाच्या कलम 54 च्या कलम (1) अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रपतींनी राष्ट्रीय असेंब्लीची बैठक बोलावली आहे.

विशेष अधिवेशनात कशावर चर्चा होणार?

वृत्तानुसार, या अधिवेशनात भारत आणि पाकिस्तानमधील बिघडत चाललेल्या राजनैतिक संबंधांवर प्रामुख्याने चर्चा होईल. विशेषतः भारताने सिंधू पाणी करार (IWT) स्थगित करण्याच्या अलिकडच्या निर्णयावर लक्ष केंद्रित केले जाईल. पाकिस्तानी माध्यमांनुसार, सरकार भारताच्या कृतीचा तीव्र निषेध करणारा ठराव राष्ट्रीय सभेत मांडण्याची तयारी करत आहे.

हेही वाचा – Pahalgam Terror Attack: 'न्यायाधीश दहशतवादी प्रकरणांच्या चौकशीतील तज्ज्ञ नाहीत', याचिकाकर्त्याला 'सर्वोच्च' फटकार

पहलगाम हल्ल्यामुळे वाढला तणाव – 

भारताने पाकिस्तानवर दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्याचे गंभीर आरोप केले आहेत. तसेच भारताने या हल्ल्याचा बदला घेण्याचा दावा केला आहे. अशातचं आता पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी आपत्कालीन अधिवेशन बोलावले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला करणारे दोन दहशतवादी पाकिस्तानातून आले होते.

हेही वाचा – पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही दक्षिण काश्मीरमध्येच; त्यांना कोणीतरी अन्न, इतर साहित्य पुरवतेय : सूत्र

पाकिस्तानमध्ये अस्वस्थता – 

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. तिथे पंतप्रधानांसोबत सतत उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत. संसदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलावण्याचा निर्णयावरून पाकिस्तानची घाबरगुंडी उडालेली दिसत आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version