Indrayani River Bridge: सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-पुणे महामार्गावरील जुना इंद्रायणी पूल बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली असून, वाहनधारकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Indrayani River Bridge: सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-पुणे महामार्गावरील जुना इंद्रायणी पूल बंद; वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

Mumbai Pune National Highway Traffic Update : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर असलेल्या पाथरगाव येथील जुन्या दगडी इंद्रायणी पुलावरून होणारी वाहतूक सुरक्षिततेच्या कारणास्तव तत्काळ प्रभावाने बंद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जाहीर केले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली असून, वाहनधारकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुंबई आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी मार्ग बदल
पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी विशेष वाहतूक बदल लागू करण्यात आले असून ते खालीलप्रमाणे आहेत:
– पुण्याकडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या किलोमीटर 94 येथून वळवण्यात आली आहेत.
– सोमाटणे फाटा येथून अवजड वाहनांना थेट मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवेश दिला जात आहे.
– वडगाव तळेगाव फाटा या ठिकाणाहूनही वाहतूक द्रुतगती महामार्गाकडे वळवण्यात येत आहे.
– मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणारी अवजड वाहने खंडाळा एक्झिट येथून जुन्या महामार्गावर न येता द्रुतगती महामार्गाने पुढे पाठवली जात आहेत.
– लोणावळा-कुसगाव टोलनाका किलोमीटर 55 वरूनही अवजड वाहनांना द्रुतगती महामार्गावर डायव्हर्ट केले जात आहे.

हेही वाचा – Jalna Accident: जालन्यात संतापजनक घटना! दुचाकीस्वाराला वाचवताना क्रेटा थेट विहिरीत; अडीच तास मदत नाही, महिलेचा दुर्दैवी मृत्यू

हलक्या वाहनांसाठी नवीन पुलाचा पर्याय उपलब्ध
हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था केली आहे. दुचाकी, तीनचाकी तसेच हलकी चारचाकी वाहने नवीन पुलावरून सुरक्षितपणे वळवण्यात येत आहेत. मात्र, दोन्ही दिशांकडून येणाऱ्या अवजड मालवाहू वाहनांना सुरक्षेच्या दृष्टीने केवळ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा वापर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

प्रवाशांना सहकार्याचे आवाहन
जुन्या पुलाची दुरवस्था आणि सुरक्षेचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या पर्यायी मार्गांमुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार असून, महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे. वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – Nashik Accident: देवळा-मालेगाव मार्गावर भीषण अपघात; समोरून आलेल्या इर्टिगाने दुचाकीला उडवलं, दोघांचा जागीच मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version