Makar Sankranti Daan 2026 : हिंदू धर्मात मकर संक्रांती हा सण अत्यंत पवित्र आणि खगोलशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा कडाक्याची थंडी ओसरून उबदार दिवसांची सुरुवात होते. तसेच, सूर्याचे उत्तरायणही सुरू होते. हा सण सकारात्मकता, अध्यात्म आणि सुगीच्या हंगामाचे प्रतीक आहे. यावर्षी 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती साजरी केली जाणार असून, भारतभर पोंगल, उत्तरायण आणि माघ बिहू अशा विविध नावांनी हा सण साजरा होईल.
मकर संक्रांती आणि दानधर्माचे महत्त्व
शास्त्रांनुसार, संक्रांतीच्या दिवशी केलेले दान अनेक पटींनी फळ देते. विशेषतः ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे किंवा ज्यांच्या आयुष्यात वारंवार अडथळे येतात, त्यांच्यासाठी हा दिवस वरदान ठरतो. या दिवशी पितरांचे स्मरण करून श्रद्धेने दान केल्यास पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि रखडलेली कामे मार्गी लागतात.
पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी 'या' वस्तूंचे दान करा:
तिळाचे दान: संक्रांतीला तिळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तीळ हे पितरांना अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते. या दिवशी काळे किंवा पांढरे तीळ दान केल्याने मानसिक शांती मिळते आणि पितृदोष शांत होतो.
गुळाचे दान: गूळ हा गोडवा आणि शुभतेचे प्रतीक आहे. तिळासोबत गुळाचे दान केल्याने आयुष्यातील कडवटपणा दूर होतो आणि आर्थिक तसेच कौटुंबिक समस्यांचे निराकरण होते.
अन्नदान: तांदूळ, गहू, ज्वारी किंवा खिचडीचे दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. गरजूंना अन्न दिल्यास घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते.
वस्त्रदान: संक्रांतीच्या काळात थंडी असल्याने गरीबांना उबदार कपडे दान करणे उत्तम मानले जाते. यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
तांब्याच्या वस्तू: तांबे हा धातू सूर्याशी संबंधित आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने या दिवशी तांब्याचे पात्र दान केल्याने सूर्यदोष आणि पितृदोष दोन्ही दूर होतात, तसेच मान-सन्मान वाढतो.
तूप आणि तेलाचे दान: ज्यांचे काम वारंवार अडकते, त्यांनी तूप किंवा मोहरीच्या तेलाचे दान करावे. यामुळे घरातील सुख-शांती कायम राहते.
गोसेवा: संक्रांतीच्या दिवशी गाईला चारा, गूळ किंवा भाकरी भरवल्यास पितरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुटुंबात आनंद येतो.
दान करताना घ्यावयची काळजी
दान नेहमी सकाळी स्नान आटोपल्यावर, शुद्ध मनाने आणि पूर्ण श्रद्धेने करावे. दान करताना आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद मागावेत. श्रद्धेने केलेले छोटेसे दानही जीवनातील मोठ्या संकटांतून मुक्तता देऊ शकते. हा सण आपल्याला दया, सेवा आणि कृतज्ञतेची शिकवण देतो.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.