वृत्तसंस्था, नवी दिल्ली
ओडिशातल्या कोरापूट जिल्ह्यात एका गरोदर महिलेने नाल्यामध्ये मुलीला जन्म दिल्याचा प्रकार घडलाय.
वैद्यकीय कागदपत्र न आणल्याने इथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर त्या हॉस्पिटलच्या आवारात एका नाल्यातच तिने मुलीला जन्म दिला.
इथल्या शहीद लक्ष्मण नायक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ही माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.