जय महाराष्ट्र, मुंबई
बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या आगामी ‘ऑक्टोबर’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 2 मिनिट 23 सेकंदाचा ट्रेलर पाहून स्पष्ट आहे की, या सिनेमातील वरूणची भूमिका त्याच्या मागील सिनेमातील भूमिकेपेक्षा फारच वेगळी आहे. यामध्ये वरुणचा अंदाज निराळा आहे.
या सिनेमाचा दिग्दर्शक शूजित सरकार असून 13 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक शूजित सरकार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, हा सिनेमा रोमांटिक नसून प्रेमावर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाष्य करणारा आहे.
सिनेमातील चित्रपटातील ट्रेलरच्या सुरुवातीलाच वरुण धवन हॉटेलमधील वेटरच्या भूमिकेत दिसतोय. सिनेमातील व्यक्तिरेखा खरीखुरी वाटण्यासाठी वरुण एक आठवडा झोपला नाही. व्यक्तिरेखा पूर्णत: जिवंत वाटण्यासाठीच शूजित सरकारने त्याला असं करण्यास सांगितलं होतं.
या सिनेमात वरूणसोबत बानीता संधू दिसणार आहे.