ऑक्टोबर हीटने पहिल्याच आठवड्य़ात राज्यभरातील नागरिकांना हैराण केले आहे. प्रचंड जाणवणाऱ्या उकाड्यामुळे संसर्गजन्य तापांसह विविध प्रकारच्या आजारांनी डोके वर काढले आहे.
अंगावर पुरळ उठणे, चट्टे येणे, अंगाला खाज सुटणे, त्वचा कोरडी पडून त्यावर पांढरे डाग दिसण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.
बराच वेळ घामट कपड्यांमध्ये राहिल्यामुळे नायटा, गजकर्ण यासारख्या त्वचाविकारांमध्येही वाढ झाल्याचं त्वचाविकारतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
6आॅक्टोबर म्हणजेच काल शनिवारी अधिकतम कमाल तापमान 37.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यिात आले. ऑक्टोबर हीट नेहमीच मुंबईकरांना हैराण करून सोडते.
ऑक्टोबर महिन्यात यावर्षीही सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ही तिसऱ्यांदा सर्वात मोठ्या तापमानाची नोंद आहे.
सामान्यतः या त्रासावर घरगुती उपाय
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.