२,२९६ रोजंदारी एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस

  एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करावे ही एसटी कर्मचारी संघटनांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी राज्यात ठिकठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात मोठे पाऊल उचलले असून २ हजार २९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे.   विलिनीकरणाची मागणी मान्य करण्यासाठी एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात महामंडळाने […]

२,२९६ रोजंदारी एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस

  एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करावे ही एसटी कर्मचारी संघटनांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी राज्यात ठिकठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात मोठे पाऊल उचलले असून २ हजार २९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे.

  विलिनीकरणाची मागणी मान्य करण्यासाठी एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात महामंडळाने कठोर भूमिका घेत रोजंदारी एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. तब्बल २ हजार २९६ रोजंदारी  कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती करण्याची नोटीस महामंडळाने बजावली आहे. तसेच २४ तासात कामावर हजर व्हा अन्यथा सेवा समाप्त करण्यात येईल, असे आदेश महामंडळाने दिले आहेत.

  एसटी कर्मचाऱ्यांना बुधवारपासून कामावर रुजू होण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले होते. तसेच ते कामावर आले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा अनिल परब यांनी दिला होता. मात्र आजही एसटीच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी संपाची भूमिका ठाम ठेवल्यामुळे २ हजार २९६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना महामंडळाने सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number