जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, तेथेही त्यांची घुसमट झाली. परिणामी राणे नाराज झाले आणि त्यांनी काँग्रेसच्या कारभारावर टीका करत पक्षाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर राणे नक्की कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
या पार्श्वभूमिवर रविवारी नारायण राणेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राणेंनी सेनेवर प्रहार करत आपल्या ‘महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष’ ची घोषणा केली. पण, राणेंचे सुपूत्र नितेश राणेंनी मात्र, कॉंग्रेसचे आमदारकी पद सोडले नाही.
याबाबत माहिती देत नितेश राणेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या मुलासोबतचा फोटो शेअर करत “माझ्या मुलाने माझ्याआधी त्याच्या आजोबांच्या ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात’ प्रवेश केला आहे”. “मी अजूनही प्रतिक्षेतच आहे”. जय स्वाभिमान!! असे ट्विट नितेश राणेंनी आपल्या ट्विटरवर शेअर केले आहे.