जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई
नवी मुंबईच्या वाशीतील मनपा रुग्णालयाच्या कंत्राटी कामगारांनी बेमुदत साखळी उपोषणाचं हत्यार उपसलं. मनपा रुग्णालयातील दोनशे कंत्राटी कामगारांची 58 महिन्यांची थकबाकी आणि दोन महिन्यांचा पगार रखडला आहे.
गेल्या पाच वर्षांपासून कामगारांना वाढीव पगार मिळला नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांनी हे बेमुदत साखळी उपोषण केलं. कामाचा योग्य मोबदला आणि पगार वाढ अशा प्रमुख मागण्या घेऊन कंत्राटी कामगारांनी हे आंदोलन केलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.