Nepal Floods: नेपाळमध्ये जलप्रलयाचा हाहाकार! 392 जणांचा मृत्यू, 1500 हून अधिक बेपत्ता; महाराष्ट्रातील 114 नागरिक संकटात

नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरामुळे 392 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता आहेत. महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकले असून प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.

Nepal Floods: नेपाळमध्ये जलप्रलयाचा हाहाकार! 392 जणांचा मृत्यू, 1500 हून अधिक बेपत्ता; महाराष्ट्रातील 114 नागरिक संकटात

नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुराने मोठं संकट ओढवलं आहे. मुसळधार पाऊस, नदीच्या प्रवाहातील वाढ आणि हिमनदीचा मोठा भाग कोसळल्यामुळे अनेक भागांमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 392 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर मोठ्या संख्येने नागरिक बेपत्ता आहेत. अनेक घरं, रस्ते आणि पूल पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.

या दुर्घटनेचा फटका भारतीय नागरिकांनाही बसला आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी अनेकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. बचाव पथकांकडून दुर्गम भागात अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील पर्यटक आणि यात्रेकरूंचीही मोठी संख्या नेपाळमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Sadhguru Shares Update On Nepal Flood: नेपाळमध्ये पुराचं रौद्ररूप! शहराचा मोठा भाग वाहून गेला; सद्गुरूंनी सांगितली नेपाळमधील भयावह परिस्थिती

महाराष्ट्रातील 114 नागरिक सध्या नेपाळमधील विविध भागांत अडकले आहेत. यापैकी 53 जण सुरक्षित असल्याची माहिती मिळाली असून ते मानसरोवर परिसरात असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित नागरिक आणि टूर्स-ट्रॅव्हल्सच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली आहे.

मुंबईतील अनिल महाजन आणि त्यांचं कुटुंबही नेपाळमध्ये अडकले आहे. मात्र त्यांनी स्वतः संपर्क साधत आपण एका हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याचं कळवलं आहे. नागपूरमधील 106 प्रवाशांनाही काठमांडूहून सुरक्षितपणे रवाना करण्यात आलं आहे. दुसरीकडे ठाण्यातील नऊ पर्यटकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नसून, जिल्हा प्रशासन त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. रायगड जिल्ह्यातील 37 नागरिकही या संकटात अडकल्याची माहिती समोर आली आहे.

या आपत्तीमागे हिमनदी कोसळण्याची घटना महत्त्वाची असल्याचं सांगितलं जात आहे. लॅंगटांग लिरुंग पर्वताच्या उत्तरेकडील भागात सुमारे 5200 मीटर उंचीवर असलेल्या ग्लेशियरचा काही भाग तुटून खाली कोसळला. त्यानंतर बर्फ, दगड आणि मातीचा मोठा साठा नदीच्या पात्रात जाऊन पडला. त्यामुळे ल्हेंदे खोला नदीचा प्रवाह अडवला गेला.

नदीचा मार्ग अडल्याने काही काळ तिथे नैसर्गिक जलसाठा तयार झाला. त्यानंतर हा अडथळा तुटल्यावर पाणी, चिखल, दगड आणि मलब्याचा प्रचंड लोंढा वेगाने खालच्या दिशेने वाहू लागला. या पुराचा सर्वाधिक परिणाम नेपाळ-चीन सीमेजवळील रसुवागढी आणि तिमुरे परिसरात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू! फडणवीसांचा पुढाकार, व्हिडिओ कॉलवरून साधला संवाद

दरम्यान, संभाव्य धोका लक्षात घेऊन नेपाळ सरकारने नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. उपग्रह छायाचित्रांच्या विश्लेषणातून नदीच्या प्रवाहात निर्माण झालेल्या अडथळ्याची माहिती समोर आली आहे. हा जलसाठा अचानक फुटल्यास पुन्हा मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सध्या नेपाळमध्ये बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू असून, अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याला प्राधान्य दिलं जात आहे. महाराष्ट्रातील प्रशासनही नेपाळमधील अधिकाऱ्यांशी संपर्कात असून बेपत्ता नागरिकांचा शोध आणि सुरक्षित नागरिकांच्या परतीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number