Nepal Flash Flood: नेपाळ महापुरात मोठा चमत्कार! 9 दिवस बोगद्यात अडकले, अखेर दोन जणांची सुखरूप सुटका

Nepal Flash Flood: नेपाळमधील आलेल्या महापुरात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.

Nepal Flash Flood: नेपाळ महापुरात मोठा चमत्कार! 9 दिवस बोगद्यात अडकले, अखेर दोन जणांची सुखरूप सुटका

Nepal Flash Flood: नेपाळमधील आलेल्या महापुरात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. काही जण बेपत्ता असून त्यांचे शोधकार्य मोठ्या प्रमाणावर चालू आहे. मृतांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत असून अशातच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. पुरामुळे बोगद्यात अडकलेल्या 2 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. 

या पुराच्या नवव्या दिवशी रसुवा जिल्ह्यातील त्रिशुली 3 ए जलविद्युत प्रकल्पातील एका बोगद्यातून या दोन व्यक्तींना जीवंत बाहेर काढण्यात आले. त्यांची ओळख कबीर महर्जन मेकॅनिकल सुपरवायझर (वय 45) आणि मेकॅनिकल फोरमन  संजय साह (वय 30) अशी पटली आहे. तसेच बचाव पथकाला त्यांना सुरक्षित बोगद्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे.

हेही वाचा – Nepal flood: तुमच्या कर्माचे भोग आम्हाला का? हिमालयीन महाप्रलयानंतर नेपाळची भारतासह 'या' देशांकडे नुकसान भरपाईची मागणी

या बचावकार्यात महत्त्वाचे म्हणजे बोगद्यातून माणसांचा आवाज ऐकू येत होता, यावर उत्तर म्हणून पथकाने 'घाबरू नका, आम्ही तुम्हांला वाचवण्यासाठी आलो आहोत' असे म्हटले. यानंतर नेपाळी सैन्य, सशस्त्र पोलीस दलाने बचाव कार्याला वेग दिला. या दोन व्यक्तींच्या सुखरूप सुटकेनंतर इतर लोक तिथे असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरु आहे. 

हेही वाचा – Nepal flood: नेपाळमधील भीषण दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमागे हे कारण? 'HiRISK' अहवालातून धक्कादायक माहिती उघड

या महापुरात मृतांची संख्या 1,259 वर पोहचली असून 12 हजार पेक्षा अधिक नागरिकांना वाचवण्यात आले आहे. तरी 5 हजार लोक अजून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number