नवाब मलिकांना वाशिम न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यानंतर न्यायालयाने मलिकांना आदेश दिल्यामुळे काही दिवसांपासून मलिकांनी वानखेडेंवरील आरोपसत्र बंद केले आहे. मात्र नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर बनावट जातप्रमाणपत्र वापरले असल्याचा आरोप केला होता. त्याचप्रकरणी आता मलिकांना न्यायालयाने दणका दिला आहे. १३ डिसेंबर रोजी वाशिम जिल्हा न्यायालयात […]

नवाब मलिकांना वाशिम न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यानंतर न्यायालयाने मलिकांना आदेश दिल्यामुळे काही दिवसांपासून मलिकांनी वानखेडेंवरील आरोपसत्र बंद केले आहे. मात्र नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर बनावट जातप्रमाणपत्र वापरले असल्याचा आरोप केला होता. त्याचप्रकरणी आता मलिकांना न्यायालयाने दणका दिला आहे. १३ डिसेंबर रोजी वाशिम जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने मलिकांना दिले आहेत.

एनसीबीचे विभागीय संचलाक समीर वानखडे यांनी बनावट जातप्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविली. त्यामुळे त्यांची नोकरी जाणार असल्याचे वक्तव्य अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले होते. मात्र समीर वानखडेजवळ अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असल्याने त्याचे चुलतभाऊ संजय वानखडे यांनी वाशिम शहर पोलिसांत एट्रॉसिटी कलमानुसार गुन्हा दाखल केला.

संजय वानखेडे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार आज वाशिम जिल्हा सत्र न्यायालाचे न्यायाधीश मेन जोगे यांनी सुनावणी केली आहे. नवाब मलिक यांना १३ डिसेंबर रोजी वाशिम न्यायालयात हजर राहण्याचे आदेश वाशिम न्यायालयाने दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number