तूमचे डोळे आणि ओठ असे करा आकर्षित –
- डोळे चांगले बोल्ड केले पाहिजे आणि ओठ चांगले डार्क करा.
- लिपस्टिकमध्ये मॅटचा किंवा ग्लॉसीचा वापर करू शकता.
- हातांना मेंहदी लावा तसेच टॅटू सुध्दा तूम्ही बनवू शकता.
- फाऊंडेशन जागी तूम्ही ब्रशरचा वापर करा.
- ग्रीन ब्ल्यू, ब्लॅक, मरून, गोल्ड ब्राऊन बरगंडी कलरचा वापर करा.
- जर मॅट लिपस्टीक नसेल तर…
- ग्लॉसी लिपस्टीक वर पावडर लावला तर ती मॅट दिसेल.
लाईनर- मस्करा
लाईनर- मस्करा घेताना तो खरचं वॉटरप्रूफ आहे का? असे प्रोडक्ट घेताना नीट चेक करून घ्या.
नवरात्रीचे पेहराव – घागरा- चोली
हेअर स्टाईल
आजकाल वेणी घालण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत.
फॅन्सीमध्ये सुध्दा बरेचसे हेअर ब्राॅच बाजारात मिळतात.
मेकअप करताना घ्या काळजी –
- नवरात्रीत गरबा खेळताना खूप घाम येतो. लाईटमध्ये आपला मेकअप अधिक उठून दिसला पाहिजे. त्यामूळे मेकअप ग्लॉसी असेल तर अधिक चांगला.
- मेकअप करताना बोल्ड किंवा डार्क कलरचा वापर करा.
- मेकअप करताना फाऊंडेशन कमी प्रमाणात लावा.
- तूमचे डोळे आणि ओठ यावर लक्ष द्या.
- रात्री मेकअप काढूनच झोपा.
- मेकअप काढल्यानंतर चेहऱ्याला मॉश्चराइजर लावून झोपा.
- मेकअप करण्याच्या आधी बर्फ लावावा.