Winter Health Tips: नाक वाहतंय, सारखा खोकला येतोय? चिंता करू नका; करा ‘हे’ 5 घरगुती उपाय

हवामान बदलामुळे सर्दी खोकला आणि नाक बंद होण्याचा त्रास वाढला आहे अशावेळी घरातल्या साध्या सामग्रीतून बनणारे हे आयुर्वेदिक उपाय शरीराला नैसर्गिक संरक्षण देतात आणि इम्युनिटीला मजबूत करतात

Winter Health Tips: नाक वाहतंय, सारखा खोकला येतोय? चिंता करू नका; करा ‘हे’ 5 घरगुती उपाय

Winter Health Tips: हवामानाचे तापमान मागील काही दिवसांपासून खाली येत आहे. सकाळचा ओलसर थंडावा, दुपारचे रिलेटिव्ह उबदार वातावरण आणि रात्रीचा पुन्हा येणारा गारवा या तीन बदलांचा थेट परिणाम श्वसनावर जाणवतो. नाक वाहणं, गळा खवखवणे, हलका खोकला सुरुवातीला क्षुल्लक वाटतो, पण योग्य काळजी न घेतल्यास तो सायनस किंवा व्हायरल सर्दीपर्यंत वाढतो. खास करून गेल्या आठवड्यात शहरातील अनेक क्लिनिक्समध्ये डॉक्टरांनी हेच जाणवलं की ओपीडीमध्ये येणाऱ्या श्वसन समस्यांच्या केसेस तब्बल 35 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

अशा वेळी जिथे पूर्वी लोक लगेच औषधांकडे धावत होते, तिथे आता पुन्हा एकदा नैसर्गिक उपचारांकडे झुकणं वाढलं आहे. घरातल्या साध्या घटकांमध्ये असा सामर्थ्यशाली गुण असतो की दुधात मिसळून, काढ्यात उकळून किंवा साध्या वाफेमधूनही शरीराला मोठा सपोर्ट मिळू शकतो.

यात बदाम, काळी मिरी आणि खडीसाखर यांचे मिश्रण सर्वात प्रभावी मानले जाते. बदाम 100 ग्रॅम, काळी मिरी 20 ग्रॅम आणि खडीसाखर 50 ग्रॅम एकत्र दळून बारीक पावडर तयार होते. रोज रात्री झोपण्यापूर्वी या मिश्रणाचा एक चमचा कोमट दुधात घेतला तर शरीराला उष्णता, स्टॅमिना आणि घश्याला आराम तिन्ही मिळतात. वारंवार सर्दी होणाऱ्यांनी सात दिवस सातत्याने हा कोर्स चालू ठेवला तर फरक स्पष्ट जाणवतो.

हेही वाचा: Methi Ladoo Benefits: हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास होतोय? घरच्या घरी बनवा स्वादिष्ट मेथीचे लाडू

नाक बंद होणं किंवा सायनसची सूज असेल तर नाकात दोन थेंब मोहरी तेल टाकणं देखील मदत करतं. या तेलातील नैसर्गिक गुणधर्म नसल पॅसेजला ओलसर ठेवतात आणि दिवसातून रात्री एक वेळ केले तरी श्वास घेणं सहज श्यक्य होत(सर्दीचा त्रास होत नाही). गावाकडे तर हा उपाय वर्षानुवर्षे चालतो आणि अजूनही ENT तज्ज्ञ काही रुग्णांना साईड सपोर्टिव्ह म्हणून याची परवानगी देतात.

सुंठ, काळी मिरी आणि पिप्पली यांचं एकत्र नाव आहे त्रिकटू. या तीन घटकांची समान प्रमाणातील पावडर अर्धा चमचा एका कप पाण्यात उकळून अर्धं झाल्यावर गाळून दिवसातून दोन वेळा घेतल्यास कफ सैल होतो आणि सुरुवातीची शिंक-खोकला फेज तिथेच थांबते. पचन सुधरल्यानं रोगप्रतिकारक प्रतिक्रियेचाही फायदा अतिरिक्त मिळतो.

घरीच करता येणाऱ्या आणि त्वरित परिणाम देणाऱ्या उपचारांमध्ये वाफ घेणं देखील महत्त्वाचं. गरम पाण्यात ओवा किंवा पुदिन्याचं तेल टाकून फक्त पाच ते सात मिनिटे डोक्यावर टॉवेल घेऊन वाफ घेतली, तरी जमा झालेला कफ लगेच loosen होतो आणि नाकाचा भाग मोकळा वाटतो. दिवसातून दोन वेळा ही वाफ घेण्याची वेळ पाळली तर रात्री झोपताना नाक बंद होण्याचा त्रास कमी होतो.

श्वसनमार्ग मजबूत ठेवण्यासाठी सकाळचे प्राणायाम सुद्धा उपयुक्त मानले जातात. कपालभाती, अनुलोम विलोम आणि भ्रामरी हे तीन मूलभूत श्वास व्यायाम दिवसाची सुरुवात करताना दहा मिनिटे केल्यास फुफ्फुसांची क्षमता टिकून राहते आणि हवामान बदलाशी शरीराची जुळवून घेण्याची क्षमता वाढते.

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number