Nashik TCS Case : धक्कादायक! MIM च्या ‘या’ नगरसेवकानेच फरार निदा खानला स्वतःच्या घरात लपायला जागा दिली?

निदा खान ही एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात असून ती त्यांच्या मालकीच्या घरात लपली असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली होती.
Nashik TCS Case : धक्कादायक! MIM च्या ‘या’ नगरसेवकानेच फरार निदा खानला स्वतःच्या घरात लपायला जागा दिली?

Nashik TCS conversion case Nida Khan Arrested from Sambhajinagar : नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) लैंगिक शोषण आणि अवैध धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खान हिला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या 40 दिवसांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएम (MIM) नगरसेवक मतीन पटेल यांनी आश्रय दिला होता. पटेल यांनी नारेगाव येथील कौसर पार्क परिसरात 2 महिन्यांपूर्वीच एक नवीन फ्लॅट खरेदी केला होता, जिथे निदा गेल्या 5 दिवसांपासून वास्तव्यास होती. या प्रकरणी पोलिसांनी मतीन पटेल यांना नोटीस बजावली असून त्यांचा मोबाईल संचही तपासासाठी जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांची मध्यरात्री मोठी कारवाई
निदा खान ही मतीन पटेल यांच्या संपर्कात असून ती त्यांच्या मालकीच्या घरात लपली असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नाशिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये संयुक्त मोहीम राबवली. सलग 2 दिवस संबंधित इमारतीवर पाळत ठेवल्यानंतर आणि तांत्रिक तपासाद्वारे खात्री पटल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. या धाडसी कारवाईत निदा खानला ताब्यात घेण्यात यश आले. यापूर्वी तिने गरोदर असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र न्यायालयाने हे प्रकरण एका 'आंतरराष्ट्रीय सिंडिकेट'शी संबंधित असल्याचे नमूद करत तिचा अर्ज फेटाळून लावला होता.

हेही वाचा – Jalna Crime: तरुणीचे निर्वस्त्र फोटो, तब्बल 10 वर्षे सततचा अत्याचार, धर्मांतराचा दबाव; जालन्यात घडलेल्या धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरला

शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन पुन्हा पोलीस कोठडीत
दुसरीकडे, याच प्रकरणातील इतर 2 प्रमुख आरोपी शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांना न्यायालयाने पुन्हा पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांना न्यायालयीन कोठडीतून पुन्हा ताब्यात घेण्यात आले असून, आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. पीडितेच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मुंबई नाका पोलिसांकडून या दोघांची कसून चौकशी सुरू असून, या गुन्ह्यातील इतर दुव्यांचा शोध घेतला जात आहे.

आंतरराष्ट्रीय फंडिंग आणि धर्मांतराच्या जाळ्याचा तपास
निदा खानच्या अटकेमुळे आता या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि परकीय निधीच्या (Funding) स्रोतांवरून पडदा उठण्याची शक्यता आहे. पीडितेची दिशाभूल करण्यासाठी वापरण्यात आलेले गुंगी आणणारे पदार्थ कोठून आले, तसेच आरोपींचे बँक व्यवहार कोणाशी संबंधित आहेत, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. हे प्रकरण केवळ वैयक्तिक गुन्ह्यापुरते मर्यादित नसून, त्यामागे धर्मांतराचे मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar: चोरी रोखायला गेले अन् चोरट्यांनी अंगावरच घातली गाडी; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version