जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
मनमाड – मालेगाव-सटाणा रस्त्यावर भीषण अपघात झालाय. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय.
रिक्षाला अज्ञात वाहनाची धडक बसल्यानं अपघात झालाय. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झालाय.
दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनांना हटवण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.