जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशिकच्या निफाडमध्ये ऊस तोडणीच्या वेळी बिबट्याचे 4 बछडे आढळून आलेत. गेल्या अनेक दिवसांपासून ह्या परिसरात बिबट्यांनी ठाण मांडून ठेवलाय. नुकतीच जन्माला आलेले बिबट्याचे 4 बछडे या परिसरात दिसून आलेत.
शरद नाठे यांना त्यांच्या शेतामध्ये हे बिबटे दिसून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजलीय. या घटनेची माहिती वनविभागाला कळवल्यानंतर वन-अधिकाऱ्यांनी हे बछडे ताब्यात घेतले. एकूणच या घटनेमुळे परिसरत भीतीचे वातावरण असून पिंजरे लावण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.