Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याची नवी ओळख; आता ‘या’ नावाने होणार ब्रँडिंग

‘सिंहस्थ’च्या पुढे ‘महासिंहस्थ’ अशी नवी ओळख निर्माण करून नाशिकचे जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्याची योजना आखली जात आहे.

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याची नवी ओळख; आता ‘या’ नावाने होणार ब्रँडिंग

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला आता नवी ओळख देण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. या कुंभमेळ्याचे ‘महासिंहस्थ’ या नावाने अधिकृत ब्रँडिंग करण्याचा विचार असून, त्यासाठी ट्रेडमार्क नोंदणीची प्रक्रियाही करण्याची तयारी सुरू आहे. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा हा देशातील महत्त्वाच्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक आहे. या कुंभमेळ्याची भव्यता केवळ देशभरातील भाविकांपर्यंतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. ‘सिंहस्थ’च्या पुढे ‘महासिंहस्थ’ अशी नवी ओळख निर्माण करून नाशिकचे जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्याची योजना आखली जात आहे.

कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आणि विकासकामे हाती घेतली जाणार आहेत. या विकासकामांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळून तब्बल ३४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Tukaram Mundhe Tweet: ‘पदं बदलतात, पण…’, राज्यात अनेक धडक कारवाया, अशातच तुकाराम मुंढेंचं तीन ओळींचं ट्वीट; नेमकं काय लिहिलं? 

प्रशासनाच्या दृष्टीने हा केवळ धार्मिक सोहळा न राहता नाशिकला पर्यटन, गुंतवणूक आणि जागतिक स्तरावरील ओळख मिळवून देण्याची मोठी संधी आहे. भाविकांसोबतच देश-विदेशातील पर्यटक, गुंतवणूकदार आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधींपर्यंत नाशिकची ओळख पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘महासिंहस्थ’ या नावाचे अधिकृत ब्रँडिंग आणि ट्रेडमार्क केल्यास कुंभमेळ्याशी संबंधित उपक्रमांना एकसंध ओळख मिळू शकते. त्यामुळे ‘सिंहस्थ’च्या पुढे आता ‘महासिंहस्थ’ या नावाने नाशिकच्या कुंभमेळ्याला नवी झळाळी देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number