नाशिक महापालिका रुग्णलयातील गलथान कारभार आज पुन्हा एकदा उघड झाला आहे.
एका महिलेच्या प्रसूती दरम्यान सदर महिलेच्या पोटात कापसाचा गोळा राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
काही दिवसांनी या महिलेच्या पोटात त्रास होत असल्याने ही महिला आज तापसणीसाठी रुग्णालयात आली असताना हा संपूर्ण प्रकार नातेवाईक आणि येथे असलेल्या कर्मचाऱ्यांचा लक्षात आला आहे, सदर महिलेचं नाव साक्री शेख असं आहे
या महिलेसोबत नेमकं काय घडलं
गेल्या काही दिवसांपासून अशा घटना वारंवार महापालिका रुग्णालयात घडत आहेत
त्यामुळे महापालिका रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याची टीका आता रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.
या संपूर्ण प्रकरणानंतर चौकशी करून संबंधित लोकांवर कारवाई केली जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.