पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायालयाकडून आज शिक्षा सुनावली जाणार आहे.
या प्रकरणाला “दुर्मिळातील दुर्मिळ” (rarest of rare) स्वरूपाचे असल्याचे नमूद करत विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, आरोपीचे कृत्य अत्यंत क्रूर आणि अमानवी असून समाजात भीती व संताप निर्माण करणारे आहे.
या गंभीर प्रकरणातील अंतिम शिक्षेबाबत न्यायालयाचा निर्णय लवकरच अपेक्षित असून संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.