Narali Bhaat Recipe: नारळी पौर्णिमेला घरच्या घरी बनवा खमंग नारळी भात; झटपट आणि सोपी पारंपरिक रेसिपी जाणून घ्या

नारळी पौर्णिमेला नैवेद्यासाठी घरच्या घरी खमंग नारळी भात कसा बनवायचा?

Narali Bhaat Recipe: नारळी पौर्णिमेला घरच्या घरी बनवा खमंग नारळी भात; झटपट आणि सोपी पारंपरिक रेसिपी जाणून घ्या

मुंबई : श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमा म्हटलं की समुद्राला नारळ अर्पण करण्यासोबतच घराघरात गोडधोड पदार्थांची लगबग सुरू होते. या दिवशी खास करून नारळी भात करण्याची अनेक घरांमध्ये परंपरा आहे. ताज्या नारळाचा सुगंध, गुळाची गोड चव आणि तुपाचा खमंग स्वाद यामुळे नारळी भात अगदी खास लागतो.

नारळी भात बनवणं अवघड नाही. योग्य प्रमाणात साहित्य घेतलं आणि भात मोकळा शिजवला, तर अगदी नवशिक्यांनाही हा पदार्थ सहज तयार करता येतो.

नारळी भातासाठी काय लागेल?

नारळी भातासाठी एक कप तांदूळ, एक कप ताजा किसलेला नारळ, पावणे एक ते एक कप गूळ, दोन चमचे तूप, काजू-बदाम, दोन लवंगा, दालचिनीचा छोटा तुकडा आणि अर्धा चमचा वेलची पूड घ्या. चिमूटभर मीठ आणि केशर वापरल्यास चवीसोबत सुगंधही खुलतो.

सगळ्यात आधी भात मोकळा शिजवा

तांदूळ स्वच्छ धुऊन साधारण 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर तो पूर्णपणे चिकट होणार नाही, याची काळजी घेत मोकळा शिजवून घ्या. भात शिजल्यानंतर तो थोडा थंड होऊ द्या.

नारळ-गुळाचं मिश्रण बनवा

आता कढईत तूप गरम करा. त्यात लवंग आणि दालचिनी घालून काजू-बदाम हलके भाजून घ्या. त्यानंतर ताजा नारळ आणि गूळ घाला. हे मिश्रण मंद आचेवर गूळ वितळेपर्यंत शिजवा.

आता भाताची रंगत वाढवा

गूळ आणि नारळाचं मिश्रण तयार झाल्यावर त्यात शिजवलेला भात सावकाश मिसळा. भाताचे दाणे तुटणार नाहीत याची काळजी घ्या. शेवटी वेलची पूड, केशर आणि अगदी चिमूटभर मीठ घाला.

कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर साधारण 5 ते 7 मिनिटे भाताला वाफ येऊ द्या. यामुळे गुळाचा स्वाद आणि नारळाचा सुगंध भातात छान मुरतो.

नारळी पौर्णिमेच्या नैवेद्यासाठी अगदी परफेक्ट

तयार झालेला गरमागरम नारळी भात तुपाचा सुगंध आणि नारळ-गुळाच्या गोडव्यामुळे अप्रतिम लागतो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी नैवेद्यासाठी किंवा कुटुंबासोबत गोड पदार्थ म्हणून हा भात नक्की करून पाहा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number