Nagpur Accident: पारडीमध्ये भीषण अपघाताचा थरार! ट्रकवर कार आदळली, दोघांचा जागीच मृत्यू; एकाची प्रकृती चिंताजनक

नागपुरातील पारडी परिसरात पहाटे कार उभ्या ट्रकवर आदळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. कळमना पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Nagpur Accident: पारडीमध्ये भीषण अपघाताचा थरार! ट्रकवर कार आदळली, दोघांचा जागीच मृत्यू; एकाची प्रकृती चिंताजनक

नागपुरातील पारडी परिसरात पहाटेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव कार आदळल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या धडकेत कारचा मोठा चक्काचूर झाला असून, अपघाताची तीव्रता एवढी होती की कारमधील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच संबंधित पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनांची पाहणी करून पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली जात आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, कारचा वेग किती होता आणि चालकाचे नियंत्रण कशामुळे सुटले, याचा तपास सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number