Nagpur Crime: नागपुरात थरार! घरात घुसून तिघांवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, धक्कदायक कारण समोर

नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे जुन्या कौटुंबिक वादातून तिघांवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Nagpur Crime: नागपुरात थरार! घरात घुसून तिघांवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, धक्कदायक कारण समोर

नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा परिसरात जुन्या कौटुंबिक वादातून अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या नातेवाईकासह घरात उपस्थित असलेल्या दोन तरुणींवर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत तिघांनाही किरकोळ दुखापत झाली असून मोठी जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धनराज देवनाथ बरबड यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी राजू लक्ष्मण बरबड (वय 48) याला अटक केली आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत अवघ्या काही तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जून रोजी दुपारी सुमारे 3 ते 3.30 वाजण्याच्या दरम्यान आरोपी राजू बरबड हा धनराज यांच्या घरी आला. जुन्या कौटुंबिक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात आरोपीने घरात असलेल्या धनराज बरबड तसेच कामानिमित्त आलेल्या दोन तरुणींच्या अंगावर पेट्रोल ओतले.

हेही वाचा: Weather Update : महाराष्ट्रात धोका वाढला! मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढणार, IMD कडून हायअलर्ट जारी

त्यानंतर त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, प्रसंगावधान आणि स्थानिकांच्या मदतीमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली नाही. त्यामुळे तिघेही किरकोळ जखमी झाले आणि मोठी दुर्घटना टळली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेमुळे धापेवाडा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुरावे गोळा केले तसेच आरोपीचा शोध सुरू केला. वेगवान कारवाई करत पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली.

हेही वाचा: Dada Bhude On Chembur School Bus Accident : चेंबूरमधील भीषण दुर्घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय; जखमी विद्यार्थ्यांच्या उपचारांचा खर्च सरकार करणार

धनराज देवनाथ बरबड यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात ही घटना जुन्या कौटुंबिक वादातून घडल्याचे समोर आले असून पोलिस या प्रकरणातील इतर पैलूंचाही तपास करत आहेत.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा प्रकारच्या हिंसक घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सावनेर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपीची अधिक चौकशी सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number