जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
नागपुरात पोलिसांची दहशत कमी झाली असल्याचे अधोरेखीत करणाऱ्या बातम्या नेहमीच समोर येत आहे. त्यामुळे प्रशानाने नागपुरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी
पावलं उचलण्यास सुरुवात झाली. मात्र, त्याला देखील चोरट्यांनी हरताळ फासला.
नागपूर सुरक्षीत करण्याच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरु आहे. या योजनेचा शुभारंभ 15 आगस्टला होणार आहे.
मात्र, त्याआधीच या सीसीटीव्हीवर चोरट्यांची नजर गेली असून शहरातील नरेंद्रनगर, माणेवाडा, सिव्हिल लाईन परिसरातील सीसीटीव्हीवर चोरट्यांनीहात साफ केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.