Mumbai Vegetable Price Hike : महागाईची झळ आता थेट स्वयंपाकघरापर्यंत! भाज्यांचे भाव दुप्पट; घरखर्चासह गृहिणींचं बजेट वाढलं

एकीकडे इंधन दरवाढ आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच आर्थिक तणावात असताना आता महागाईची झळ थेट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली आहे.

Mumbai Vegetable Price Hike : महागाईची झळ आता थेट स्वयंपाकघरापर्यंत! भाज्यांचे भाव दुप्पट; घरखर्चासह गृहिणींचं बजेट वाढलं

एकीकडे इंधन दरवाढ आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच आर्थिक तणावात असताना आता महागाईची झळ थेट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली आहे. मुंबईसह उपनगरातील बाजारपेठांमध्ये टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, पालक, कडीपत्ता, आले, मेथी, पुदिना, लिंबू, इतर भाज्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले असून रोजच्या वापरातील भाज्या खरेदी करतानाही नागरिकांना आता जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

हेही वाचा- Gold Silver Rate Today: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या मुंबई, पुणे आणि दिल्लीतील आजचे ताजे दर

काय आहेत नवे दर जाणून घ्या… 
कोथिंबिर अगोदर 14 रुपये जुडी होती, जी आता 20 रुपयांनी विकली जाणार आहे. तर कडीपत्ता अगोदर 10 रुपये होता, जो देखील आता 20 रुपयांनी विकला जाणार आहे. पालक अगोदर 15 रुपये जुडी होती, जी आता 20 रुपयांनी विकला जाणार आहे. तसेच पुदिना अगोदर 5 रुपये होता, जो आता 15 रुपयांनी विकला जाणार आहे.

ढोबळी मिरची आधी 30 ते 40 रुपयांनी विकली जात होती जी आता 50 रुपयांनी विकली जाणार आहे. गवार 40 रुपयांवरून 55 प्रति किलो, मिरची 60 रुपयांवरून 100 प्रति किलो तर टोमॅटो 25 रुपयांवरून 30/40 प्रति किलो अशा भावात विकले जाणार आहेत. दरम्यान टोमॅटो, कांदा, बटाटा, कोथिंबीर यांसारख्या रोजच्या वापरातील भाज्यांचे भाव दुप्पट झाल्याने नागरिक चिंतेत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number