मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेत कोण मारणार बाजी ?

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेसाठी अर्थात सिनेटसाठी मंगळवार २४ सप्टेंबर २०२४ रोजी मतदान झाले. अधिसभेच्या दहा जागांसाठी (नोंदणीकृत पदवीधरांच्या जागा) २८ उमेदवार रिंगणात होते.
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेत कोण मारणार बाजी ?

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेसाठी अर्थात सिनेटसाठी मंगळवार २४ सप्टेंबर २०२४ रोजी मतदान झाले. अधिसभेच्या दहा जागांसाठी (नोंदणीकृत पदवीधरांच्या जागा) २८ उमेदवार रिंगणात होते. विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकूण ३८ मतदान केंद्रावर आणि ६४ बूथवर मतदान झाले. सुमारे ५५ टक्के मतदान झाले. आता मतमोजणी सुरू आहे. आदित्य यांची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांच्यात मुख्य लढत आहे. छात्र भारती आणि बहुजन विकास आघाडी यांनीही उमेदवार उभे केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, शिवसेनेची विद्यार्थी संघटना यांनी उमेदवार उभे केलेले नाहीत.

मतदान : मंगळवार २४ सप्टेंबर २०२४, सुमारे ५५ टक्के मतदान
मतमोजणी : शुक्रवार २७ सप्टेंबर २०२४

शिउबाठा युवा सेनेच्या उमेदवारांची नावे  

  1. प्रदीप सावंत
  2. मिलिंद साटम
  3. परम यादव
  4. अल्पेश भोईर
  5. किसन सावंत
  6. स्नेहा गवळी
  7. शीतल शेठ   
  8. मयूर पांचाळ  
  9. धनराज कोहचडे 
  10. शशिकांत झोरे

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांची नावे

  1. हर्षद भिडे 
  2. प्रतीक नाईक 
  3. रोहन ठाकरे 
  4. प्रेषित जयवंत 
  5. जयेश शेखावत 
  6. राजेंद्र सायगावकर 
  7. निशा सावरा 
  8. राकेश भुजबळ 
  9. अजिंक्य जाधव 
  10. रेणुका ठाकूर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version