Mumbai Rain Accident : मुंबईत पावसाचा जोर कायम असताना दुर्घटनांचे सत्रही सुरू; कुर्ल्यात झाड कोसळून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

मुंबईत एकीकडे पावसाचा जोर कायम असतानाच दुर्घटनांचे सत्रही सुरू झाले आहे. मुंबईतील कुर्ला येथील कामानी परिसरात नवपाडा, फिनिक्स मॉलसमोर झाड कोसळून 63 वर्षीय एका वृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Mumbai Rain Accident : मुंबईत पावसाचा जोर कायम असताना दुर्घटनांचे सत्रही सुरू; कुर्ल्यात झाड कोसळून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

मागील पाच दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा मुंबईला मोठा फटका बसला आहे. कालपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला होता आणि आज देखील मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असून हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये कालपासून जोरदार पाऊसाची जोरदार बॅटिंग सुरू असून नागरिकांची तारांबळ उडालेली आहे. आज दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी सुमुद्राला मोठी भरती येणार लाटांची उंची तब्बल 4 पूर्णांक 25 मीटर असण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, पालिका आणि राज्यसरकारने  नागरिकांना आवाहन केलं आहे.

हेही वाचा- Jalna Accident: जालना-बीड महामार्गावर मोठा अपघात! दोन एसटी बसची भीषण धडक; विद्यार्थ्यांसह 30 ते 40 जण जखमी

अशातच आज सकाळपासून सोसायट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली असताना झाड पडण्याची घटना घडली आहे. मुंबईत एकीकडे पावसाचा जोर कायम असतानाच दुर्घटनांचे सत्रही सुरू झाले आहे. मुंबईतील कुर्ला येथील कामानी परिसरात नवपाडा, फिनिक्स मॉलसमोर झाड कोसळून 63 वर्षीय एका वृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. युनूस कुंडावाला असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या घटनेनंतर महानगरपालिकेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून झाड हटवण्याचे काम पूर्ण केले. सध्या संबंधित वृद्ध व्यक्तीला राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.  

हेही वाचा- Nagpur : घराबाहेर पडले आणि अचानक गायब झाले! नागपूरमधील एकाच कुटुंबातील 5 जण बेपत्ता, नेमकं काय घडलं?

मुंबईत यंदा पावसाळ्यात झाड कोसळून मृत्यू होण्याची ही तिसरी वेळ आहे, तर एका व्यक्तीचा मृत्यू मॅनहोलमध्ये पडून झाला होता. याचपार्श्वभूमिवर कुर्ला येथील झाड कोसळल्यामुळे आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी दुर्घटना घडल्यानंतरही अजून पर्यंत कुठलेही अधिकारी घटनास्थळी न आल्यामुळे मनसेकडून काळ्या फिती बांधून पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. lbs मार्ग रोखण्याचा प्रयत्न मनसेने केला असता पोलिसांनी त्यांना रोखले असून यावेळी पोलीस व मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. दरम्यान कुर्ला कामानी येथे झाड कोसळून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर महापौर व उपमहापौर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मनसेने केले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number