मध्य रेल्वेच्या त्या स्थानकांवर आता लोकल थांबणार नाही

मध्य रेल्वेच्या त्या स्थानकांवर आता लोकल थांबणार नाही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईच्या जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर आता मालाड आणि गोरेगावहून सुटणाऱ्या जलद लोकल थांबणार नाहीत. जोगेश्वरी स्थानकावर यासंबंधी घोषणा करण्यात आली आहे. बोरिवलीहून सुटणाऱ्या जलद लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यात जोगेश्वरीत गेल्या काही वर्षांत लोकसंख्या वाढली आहे.

त्यामुळे मालाड आणि गोरेगावहून सुटणाऱ्या लोकलवरच जोगेश्वरीतील रेल्वे प्रवाशांची भिस्त असते. मात्र, रेल्वेनं त्यांचा हा पर्यायही बंद केला आहे. त्यामुळे रेल्वेच्या या निर्णयाला संतप्त प्रवाशांनी रेल रोको इशाऱ्याची हाक दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version