Mumbai Railway Incident : जोगेश्वरी स्थानकातील घटना! तिकीट विचारताच प्रवाशाने TC वर उचलला हात, मारहाणीत डोळ्याखाली भयंकर इजा

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावरील जोगेश्वरी स्टेशनच्या दक्षिण पुलावर 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 च्या सुमारास तिकिटावरून हाणामारीची घटना समोर आली आहे.

Mumbai Railway Incident : जोगेश्वरी स्थानकातील घटना! तिकीट विचारताच प्रवाशाने TC वर उचलला हात, मारहाणीत डोळ्याखाली भयंकर इजा

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावरील जोगेश्वरी स्टेशनच्या दक्षिण पुलावर 9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 च्या सुमारास तिकिटावरून हाणामारीची घटना समोर आली आहे. यात तिकीट तपासनीस आणि प्रवाशी यात बेदम मारामारी झाली असून दोघांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

हेही वाचा – Mira Bhayandar : मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा वादाची ठिणगी; पर्यूषण काळात भाजप आमदाराच्या शाळेत कांदा-लसूणला मनाई

नेमके काय घडले?
जोगेश्वरीच्या दक्षिण पुलावर प्रवाशांची तिकीट तपासणी सुरू होती. यावेळी TTE आशीष रंजन गुप्ता हे ऑन-ड्युटी होते, त्यांनी एका प्रवाशाला तिकीटबद्दल विचारणा केली. तिकीट दाखवायचं सोडून तो प्रवासी वाद घालू लागला आणि रागाच्या भरात त्या प्रवाशाने TTE च्या चेहऱ्यावर जोरात ठोसा मारला. यामुळे  TTE च्या चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. 

 या घटनेची माहिती मिळताच, रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी अंधेरी रेल्वे पोलिसांना माहिती देण्यात आली. चौकशीत प्रवाशाचे नाव अजय (33) असल्याचे सांगितले. तो अकोला जिल्ह्यातील रंका नगर परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास अंधेरी रेल्वे पोलीस करीत असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number