मुंबई लोकलमधील प्रवाशांची गर्दी आणि त्यातून होणारे किरकोळ वाद हे नवीन नाहीत. मात्र, ठाणे-बदलापूर मार्गावरील लोकलमध्ये महिलांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.व्हायरल व्हिडीओमध्ये काही महिला प्रवाशांमध्ये आधी शाब्दिक वाद सुरू असल्याचे दिसते. काही क्षणांतच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि महिलांनी एकमेकींना मारहाण करण्यास सुरुवात केली. एकमेकींचे केस ओढणे, चापट मारणे आणि धक्काबुक्की करत असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
डब्यातील इतर प्रवाशांनी हस्तक्षेप करून हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केल्याचेही व्हिडीओमध्ये दिसते. गर्दीच्या डब्यात घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.हा वाद नेमका कोणत्या कारणामुळे सुरू झाला, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. जागेवरून झालेला वाद, गर्दीत झालेली धक्काबुक्की किंवा अन्य काही कारणामुळे हा प्रकार घडला का, याबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू आहेत.