Mumbai Local Mega Block Update: मुंबईकरांनो उद्या वेळापत्रक बघूनच बाहेर पडा, तिन्ही मार्गांवर असणार मेगा ब्लॉक, मोठी अपडेट समोर

रविवारी जर तुम्ही घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर रेल्वेच्या बदललेल्या वेळापत्रकाची माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे.
Mumbai Local Mega Block Update:  मुंबईकरांनो उद्या वेळापत्रक बघूनच बाहेर पडा, तिन्ही मार्गांवर असणार मेगा ब्लॉक, मोठी अपडेट समोर

Mumbai Local Mega Block Update : उद्या रविवार, 21 डिसेंबर 2025 रोजी मुंबईतील तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांवर महत्त्वाचे मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर रेल्वेच्या बदललेल्या वेळापत्रकाची माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल उशिराने धावतील.

मध्य रेल्वे (मुख्य मार्ग): ठाणे-कल्याण दरम्यान विशेष काम
मध्य रेल्वेवर उद्या सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर (Thane-Kalyan) देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा फटका उपनगरीय लोकल वाहतुकीला बसणार असून गाड्या नियोजित वेळेपेक्षा 15 ते 20 मिनिटे उशिराने धावतील. तसेच, या काळात लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या जलद मार्गिकेवरून वळवण्यात आल्या आहेत. मेगाब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्याही रद्द करण्यात आल्या असल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागू शकतो.

हेही वाचा – Madh-Versova Bridge:वाहतूक कोंडी सुटणार! मढ-वर्सोवाकरांचा प्रवास आता सुखकर होणार, 'या' पुलाचे काम अखेर मार्गी

हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्ग: पनवेल-वाशी दरम्यान सेवा बंद
– हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडे जाणारी आणि तिकडून येणारी वाहतूक विसकळीत होईल.
– CSMT ते पनवेल/बेलापूर (Down): सकाळी 9:45 ते दुपारी 3:12 दरम्यान सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील.
– पनवेल ते CSMT (Up): सकाळी 10:33 ते दुपारी 3:49 वाजेपर्यंतच्या सर्व फेऱ्या बंद राहतील.
– ट्रान्स-हार्बर (Thane-Panvel): ठाणे ते पनवेल दरम्यान सकाळी 10:01 ते दुपारी 3:20 आणि पनवेल ते ठाणे दरम्यान सकाळी 11:02 ते दुपारी 3:53 वाजेपर्यंतच्या गाड्या धावणार नाहीत.

पश्चिम रेल्वे: महिनाभराचा 'रात्रीचा मेगाब्लॉक'
पश्चिम रेल्वेवर प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. बोरिवली ते कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम करण्यासाठी आज, शनिवार 20 डिसेंबरपासून ते 18 जानेवारी 2026 पर्यंत विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक दररोज रात्री 11:30 ते पहाटे 4:30 या वेळेत असेल. या कामामुळे उद्या रविवारपासून दररोज रात्रीच्या सुमारे 80 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्यरात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना महिनाभर या बदलाचा त्रास सहन करावा लागणार आहे.

हेही वाचा – Maharashtra Weather Update: थंडीचा जोर कायम; राज्यात किमान तापमानात घट, वरळीत हवेची गुणवत्ता 162

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version