मुंबईतील Gen Z व Gen Alpha साठी लोकलमध्ये नवी व्यवस्था? 12 पैकी 3 डबे विद्यार्थ्यांसाठी…

गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये मोठी गर्दी होत असल्याने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

मुंबईतील Gen Z व Gen Alpha साठी लोकलमध्ये नवी व्यवस्था? 12 पैकी 3 डबे विद्यार्थ्यांसाठी…

मुंबईतील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लोकल प्रवासाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डबे राखीव ठेवावेत, अशी मागणी भाजप नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आहे. मुंबईतील मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवास करतात. गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये मोठी गर्दी होत असल्याने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुंबई लोकलच्या 12 डब्यांच्या गाडीत विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवावेत, अशी मागणी तेजस्वी घोसाळकर यांनी केली आहे. विशेषतः पहाटे 5 ते सकाळी 11 वाजेपर्यंत हे तीन डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात यावेत, अशी मागणी पत्राद्वारे रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

हेही वाचा – BMC Corporator Mobile Allowance: नगरसेवकांना मोबाईल भत्त्याची थेट रक्कम मिळणार? बिलाची अट रद्द करण्याचा प्रस्ताव

शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुलभ प्रवास करता यावा, तसेच गर्दीच्या वेळेत त्यांना होणारा त्रास कमी व्हावा, हा या मागणीमागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा दिलासा मिळू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा – Gokul Milk Union Election 2026: गोकुळ निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; चार महिन्यांची मुदत फेटाळली, 60 दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश 

मुंबईतील Gen Z आणि Gen Alpha पिढीतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात लोकलने प्रवास करतात. त्यामुळे त्यांच्या प्रवासाच्या सुरक्षिततेचा आणि सोयीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डब्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आता रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वे-पश्चिम रेल्वे प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number