Mumbai Local: मुंबईत प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; किरकोळ वादातून धावत्या लोकलमधून तरुणाला ढकललं

गेल्या काही दिवसांपासून मुंबई उपनगरीय रेल्वेत किरकोळ कारणावरून वाद होऊन प्रवाशाच्या जीवावर बेतल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच मुंबईत धावत्या लोकलमधून तरुणाला ढकलून दिल्याची घटना घडली आहे.

Mumbai Local: मुंबईत प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; किरकोळ वादातून धावत्या लोकलमधून तरुणाला ढकललं

गेल्या काही दिवसांपासून मुंबई उपनगरीय रेल्वेत किरकोळ कारणावरून वाद होऊन प्रवाशाच्या जीवावर बेतल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच मुंबईत धावत्या लोकलमधून तरुणाला ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी रात्री गोरेगाव-बोरिवलीदरम्यान लोकलच्या दरवाजात उभे राहण्यावरून किरकोळ वाद झाला. या वादातून एका 30 वर्षीय तरुणाने 24 वर्षीय प्रवाशाच्या पाठीवर जोरदार लाथ मारून त्याला ढकलून दिले. ज्यामुळे धावत्या लोकलमधून खाली पडून तो गंभीर जखमी झाला.

समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री नालासोपारा येथील रहिवासी तौसिफ शेख हा तरुण त्याचा सहकारी हुसेन अली याच्यासोबत रात्री 8.41 वाजताची गोरेगावहून विरारच्या दिशेने जाणारी धीमी लोकल पकडून सामान्य डब्यात दरवाजाजवळ उभा होता. त्यावेळेस कांदिवली स्थानकात राहुलकुमार पांडे हा त्याच डब्यात चढला.

हेही वाचा- Sangli Satish Patil Death : ओव्हरटेकचा प्रयत्न जीवावर बेतला! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमनच्या स्वीय सहाय्यकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

तो तौसिफ आणि हुसेनसमोर उभा राहिल्यानंतर त्यांच्यात वादाला सुरुवात झाला यादरम्यान दरवाजाजवळ गर्दी होऊ नये यामुळे तौसिफने पांडेला आत सरकण्यास सांगितले यावरून दोघांमध्ये वाद झाला. यादरम्यान तौसिफचा सहकारी हुसेनने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र बोरिवली स्थानकातून लोकल सुटत असतानाच पांडेने तौसिफच्या दिशेने जात त्याच्या पाठीवर जोरदार लाथ मारली. यामुळे तोल जाऊन तौसिफ धावत्या लोकलमधून खाली पडला.

जखमी अवस्थेत असलेल्या तौसिफला रेल्वे पोलिसांनी त्याला तातडीने प्रथमोपचारासाठी आपत्कालीन वैद्यकीय कक्षात नेले. त्यानंतर उपचारांसाठी कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी नालासोपारा येथील राहुलकुमार पांडे याला अटक केली आहे. दरम्यान, लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाला धावत्या ट्रेनमधून खाली पडावे लागल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number