जय महाराष्ट्र न्यूज, राजापूर
मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर वाटुळजवळ खासगी बस पलटी होऊन अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास ही घटना
घडली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 34 जखमी झाले आहेत.
बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते. चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने येत असतांना या
बसला अपघात झाला.
या अपघातात 1 जण जागीच ठार झाला असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींना लांजाच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल
करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.