जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
धोबी घाट असा शब्द ऐकला तर आपल्या डोळ्या समोर येतं की धोबी कपडे धुत आहेत. पाण्याच्या टाक्या आणि पाण्यामुळे अस्वच्छ झालेल्या भिंती.
मात्र, कप परेड मधील धोबी घाटाचे रूप पालटलं आहे. मिसाल मुंबई या अभियाना अंतर्गत रूबल नागी यांनी धोबी घाटातील घरांना वेगवेगळ्या रंगांनी रंगवले आहे.
त्यामुळे धोबी घाट आकर्षक आणि सुंदर दिसत आहेत.येतील कामगार आणि रहीवासींना या गोष्टीमुळे समाधान वाटत आहे. काही दिवसांत अस्वच्छ असलेला धोबीघाट रंगामुळे सुंदर दिसू लागला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.