शिवसेनेचा ‘हा’ ड्रीम प्रोजेक्ट अखेर होणार पूर्ण!

शिवसेनेचा ‘हा’ ड्रीम प्रोजेक्ट अखेर होणार पूर्ण!

मुंबईमधील वाहतुकीला गती देण्यासाठी नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यान 29 कि.मी. लांबीचा मुंबई किनारा रस्ता प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा प्रकल्प उभारणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न आहे.मुंबईच्या या कोस्टल रोडला  आता स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाला सर्व पक्षांच्या सदस्यांनी पाठिंबा दर्शवला.

पुढील 4 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाची मूळ किंमत 8 हजार कोटी आहे, तर कर जोडून प्रकल्पाची किंमत 12 हजार कोटींवर पोहचली आहे. या प्रकल्पाचं कंत्राट ‘एल अँड टी’ आणि ‘हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन’ या कंपनीकडे देण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी 2013 पासून याबाबत पाठपुरावा केला होता. याबाबत  मुंबई महापौर, आयुक्त यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मुंबईसाठी अतिशय महत्त्वपूर असलेल्या कोस्टल रोडला अखेर मंजुरी मिळाल्यानं उद्धव ठाकरे यांनी राज्य तसंच केंद्र सरकारचे आभार मानले असल्याची प्रतिक्रिया आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

 

  • पुढील चार वर्षांत मुंबई कोस्टल रोड प्रकल्प प्रत्यक्षात येणार आहे. 
  • कोस्टल रोड प्रोजेक्टला स्थायी समितीत मंजुरी
  • कोस्टल रोड प्रोजेक्टला सर्वपक्षीय सदस्यांचा पाठिंबा
  • चार वर्षांत प्रकल्प होणार पूर्ण
  • एल अँड टी आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट
  • कोस्टल रोडची किंमत 12 हजार कोटींवर

 

वाहतूक कोंडी फुटणार

  • या प्रकल्पासाठी गिरगाव चौपाटी येथे भूमिगत बोगदा बांधण्यात येत आहे.
  • चौपटी येथून निघालेला हा बोगदाप्रियदर्शनी पार्कजवळ बाहेर पडेल. 

नरिमन पॉईंट ते कांदिवली – 29 कि.मी. सागरी मार्ग

  • पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे सी लिंक पर्यंत या 9.98 किमीचे काम 
  • त्यानंतर वांद्रे सी लिंक ते कांदिवली या दुसऱ्या टप्प्याचे काम करण्यात येणार.
  • किनारपट्टीवर भराव टाकून, पूल आणि बोगद्यांचं बांधकाम करुन कोस्टल रोडची बांधणी केली जाणार आहे.
  • कोस्टल रोडवर रूग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version