जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दिवाळीप्रमाणेच 31 डिसेंबरच्या रात्री होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीवर बंदी आणण्यासाठी धर्मराज्य पक्षांनं ठाणे पोलीस आयुक्तालयाला पत्र लिहलयं.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं वायू आणि ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी फटाके वाजवण्यावर बंदी आणली होती. तसेच 31 डिसेंबरला नव वर्षाच्या स्वागतासाठी वाजवण्यात येणाऱ्या फटाक्यांवरही प्रशासनानं बंदी घालावी अशी मागणी पत्राद्वारे केलीये.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.